माजलगाव : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आरोग्य यज्ञ माजलगाव मतदारसंघात पोहचला आहे. दरम्यान, हा आरोग्य यज्ञ दि.१६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तो १९ सप्टेंबरपर्यंत असेल, अशी माहीती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत देण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आरोग्य यज्ञ आता बीड जिल्ह्यात पोहचला आहे. गुरूवार, दि.१६ सप्टेंबर रोजी माजलगाव तालुक्यातील मनूर, लुखेगाव, गोविंदपूर, मंजरथ, ढेपेगाव या गावी तर शुक्रवार, दि.१७ सप्टेंबर रोजी शिंपेटाकळी, नागडगाव, सांडस चिंचोली, आबेगाव, सुरूमगाव आदी गावात कक्षामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. गरजूंना आवश्यक त्या औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. माजलगाव तालुक्यानंतर किल्लेधारूर आणि वडवणी तालुक्यात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, वडवणी तालुकाप्रमुख संदिप माने, किल्लेधारूर तालुकाप्रमुख बाळासाहेब कुरूंद आदी उपस्थिती राहणार आहे. शिबीरे यशस्वी करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बीड जिल्हा समन्वयक उज्ज्वलाताई भोपळे, माजलगाव तालुका समन्वयक भगीरथ तोडकरी, वडवणी तालुका समन्वयक ओमराजे जाधव, बीड तालुका समन्वयक विजयराज काटे, गेवराई तालुका समन्वयक धर्मराज आहेर, अंबाजोगाईचे खंडू पाटील, धारूरचे गोवर्धन बडे, बालासाहेब फपाळ आदी परिश्रम घेत आहेत.
कक्षप्रमुख मंगेश चिवटे
Comment here