हजारो शिवभक्तांचे डोळे पाणावले;’ॐ नमः शिवाय’च्या गजरात झाला समाधीविधी
माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांना शनिवार, दि.११ सप्टेंबर रोजी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांचे डोळे पाणावले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली समाधीविधी पार पडला. हजारो शिवभक्तांनी ‘ॐ नमः शिवाय’च्या गजरात तपोरत्नं माजलगावकर महाराजांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
शुक्रवारी तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील भक्तांची अंत्यदर्शनासाठी रिघ लागली होती. यावेळी श्री श्री श्री १००८ रावळसिध्दी विभूषित हिमवत्केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर जगद्गुरू भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णेकर, श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज माळकवठेकर, पाथरीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, श्रीगुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्रीगुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, श्रीगुरू महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर, श्रीगुरू बादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर,श्रीगुरू महन्तमा स्वामी महाराज थोरवेकर, वेदांताचार्य सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज थोरवे मठ वसमतकर, श्रीगुरू सुर्यकांतेश्वर शिवाचार्य महाराज, श्रीगुरू चन्नबसव शिवाचार्य गुरू महालिंग शिवाचार्य बर्दापूरकर यांच्यासह ३० पेक्षा शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील हजारो भक्तगणांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली. शिवाचार्य महाराज तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांच्या समाधीविधीस उपस्थित होते. आमदार प्रकाश सोळंके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राधाकृष्ण होके पाटील, मोहनराव सोळंके, रमेशराव आडसकर, अप्पासाहेब जाधव, अशोक होके पाटील, बबनआप्पा खुर्पे, सोमनाथआप्पा हालगे, सोमनाथआप्पा साखरे, प्रभाकर वाघीकर, बाबुराव पेठकर, भालचंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी वाडेवाले, ज्ञानेश्वर मेंडके, अरूण राऊत, अॅड.सुरेश दळवे आदींसह विविध पक्षांचे नेते कार्यकर्त्यांनी तपोरत्नं महाराजांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेतले. हजारो भक्तगणांनी अंत्यदर्शनासाठी मठात हजेरी लावली.
Comment here