आपला जिल्हा

शिवसेना आरोग्य यज्ञाचा ३ हजार गरजवंतांना लाभ

माजलगाव मतदारसंघात शिबिरांना तुफानी प्रतिसाद
माजलगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांना माजलगाव मतदारसंघात तुफानी प्रतिसाद मिळाला. माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर, लुखेगाव, मनूर, मंजरथ, ढेपेगाव, नागडगाव, सांडस चिंचोली, वडवणी तालुक्यातील चिंचाळा, देवडी, साळिंबा आणि धारूर तालुक्यातील गांवदरा, भोपा येथील आरोग्य आरोग्य शिबिरांमध्ये जवळपास ३ हजार पेक्षा अधिक गरजवंतांनी लाभ घेतला, अशी माहिती ‘वर्तमान’शी बोलताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
 वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मार्फत पूरग्रस्त भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा आधार ठरला आहे. गुरूवारी माजलगाव येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यभर सुरू असलेल्या सामाजिक कामाची माहिती कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, रामराजे सोळंके, तुकाराम येवले यांच्या हस्ते औषधी किट वाटप केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने राज्यात १०० रूग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी ६५ रूग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले आहे. जनतेला त्याचा लाभही मिळत आहे. उर्वरित ३५ रूग्णवाहिकांचे लवकरच वाटप होणार आहे. कोरोना संकटात नामांकित कंपनीच्या ऑक्सिजन मशीन ज्याची किंमत ७५ हजार अशा ५०० मशीनचे वाटप केले. रूग्णांची तपासणी करून मोफत औषधी वाटप करत आहोत, त्या नामांकित कंपनीच्या असून १२५ प्रकारची औषधी असल्याचे चिवटे यांनी सांगितले. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या युक्तीप्रमाणे आम्ही काम करतो. आम्ही फोटोशेसनसाठी नाही तर समाजातील तळागाळातील मानवाला सेवा मिळावी यासाठी काम करत असल्याचेही कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. या मदत कक्षाचा वैद्यकीय सेवांचा लाभ गोविंदपूर, लुखेगाव, मनूर, मंजरथ, ढेपेगाव, नागडगाव, सांडस चिंचोली(ता.माजलगाव), गांवदरा, भोपा(ता.धारूर), चिंचाळा, देवडी, साळिंबा (ता.वडवणी) यासह अनेक गावातील नागरिकांना देण्यात आला. या गावातील नागरिकांची डॉ.यशवंत राजेभोसले, डॉ.शेख अफरोज, डॉ.संतोष गवते, डाॅ.युवराज कोल्हे यांनी आरोग्य तपासणी केली. मोठ्या आजारासाठी व गरजू लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व पंतप्रधान वैद्यकीय सहायताबाबत मार्गदर्शन केले. माजलगाव, वडवणी, धारूर या तालुक्यात ३  हजारांपेक्षा अधिक गरजवंतांनी याचा लाभ घेतला. जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, रामराजे सोळंके, तुकाराम येवले, अतुल उगले, अनिल धुमाळ, आनंद धुमाळ, राम राऊत, ऋषिकेश देशमुख, नितीन हिलाल, जितेंद्र सातव, प्रविण गवारे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बीड जिल्हा समन्वयक उज्ज्वलाताई भोपळे, माजलगाव तालुका समन्वयक भगीरथ तोडकरी, वडवणीचे समन्वयक ओमराजे जाधव, बीडचे समन्वयक विजयराज काटे, गेवराईचे धर्मराज आहेर, खंडू पाटील, सुरज काटकर आदी उपस्थित होते.
माजलगाव : तालुक्यातील गोविंदपूर येथे आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, कक्षप्रमुख मंगेश चिवटे, रामराजे सोळंके, तुकाराम येवले, अतुल उगले, उज्ज्वलाताई भोपळे आदी.

धारूर : तालुक्यातील भोपा येथे पत्रकारांना मोफत प्रथमोपचार कीट वितरण करताना कक्षप्रमुख मंगेश चिवटे, धारूर तालुकाप्रमुख बाळासाहेब कुरूंद, ज्येष्ठ पत्रकार बाबा श्रीहरी देशमाने, अनिल महाजन, बालासाहेब फपाळ, दीपक गडसिंग आदी.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य सर्व घटकांसाठी : बाबा श्रीहरी देशमाने 
 सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य दखल घेण्याजोगे आहे. पत्रकारांच्या आरोग्याकडे लक्ष देवून बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी प्रथमोपचार कीट वितरण करून समाजाच्या सर्व घटकांना आपल्या आरोग्य यज्ञात सहभागी करून घेण्याचे महान कार्य कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची टीम करत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार बाबा श्रीहरी देशमाने यांनी काढले, ते भोपा येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी शिवसेना धारूर तालुकाप्रमुख बाळासाहेब कुरूंद, पत्रकार अनिल महाजन आदींची उपस्थिती होती. डॉ.शेख खमर आणि डॉ.दिलीप वाघचौरे यांनी रूग्णांची तपासणी केली. हे शिबिर यशस्वी संपादक बालासाहेब फपाळ, गोवर्धन बडे, भगीरथ तोडकरी यांनी परिश्रम घेतले.

Comment here