19 गावांसाठी 1 कोटींवर निधी आणला खेचून
माजलगाव : राष्ट्रवादीचे युवा नेते तथा बीड जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती जयसिंग सोळंके यांनी माजलगाव तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरू केला असून भूमिपूजन आणि विकास शुभारंभ सोहळ्यानिमित्त त्यांच्या झंझावाती दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, 19 गावांमध्ये विविध विकास कामांसाठी एक कोटी 14 लक्ष रूपयांचा निधी खेचून आला आहे. या गावांमध्ये मुलभूत सुविधा सुरू होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना सिमेंट काँक्रेट रस्ते, नाल्यांची बांधकामे यासह विविध विकास कामांसाठी 25-15 योजनेतुन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विविध विकास कामांचा दि. 21, 22 सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. यात माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथे 5 लक्ष रूपये, फुलेपिंपळगाव येथे 13 लक्ष रूपये, ब्रह्मगाव येथे 5 लक्ष रूपये, सिद्धेश्वरनगर येथे 5 लक्ष रूपये, कल्याणनगर येथे 5 लक्ष रूपये, छोटेवाडी येथे 5 लक्ष रूपये, मोठेवाडी येथे 5 लक्ष रूपये, गंगामसला येथे 5 लक्ष रूपये, रोषणपुरी 5 लक्ष रूपये, नागडगाव 5 लक्ष रूपये, मोगरा येथे 8 लक्ष रूपये, केसापुरी वसाहत येथे 5 लक्ष रूपये, पायतळवाडी 5 लक्ष रूपये, देवखेडा येथे 5 लक्ष रूपये, ढोरगाव येथे 5 लक्ष रूपये, राजेवाडी येथे 5 लक्ष रूपये, देवळा येथे 5 लक्ष रूपये, बेलुरा येथे 5 लक्ष रूपये, वांगी येथे 13 लक्ष रूपये अशा एकूण 19 गावांमध्ये मूलभूत सुविधा 25-15 योजने अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्यांची बांधकामे या विविध विकास कामांसाठी अंदाजे एकूण एक कोटी 14 लक्ष रूपये निधी देण्यात आलेला आहे. या विविध विकास कामांचा शुभारंभ बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सभापती कल्याण आबूज, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, विश्वांभर थावरे, अॅड.प्रमोद तौर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत शेजुळ, प्रा.प्रकाश गवते, पंचायत समितीचे सभापती भागवतराव खुळे, पंचायत समितीचे उपसभापती डाॅ.वसिम मनसबदार, सदस्य जयदत्त नरवडे, सुशिल साळुंके, शशांक सोळंके, शिवाजी डाके, इंद्रजित वानखेडे, बालासाहेब फपाळ आदींसह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
जयसिंग सोळंके यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या व्यथा
माजलगाव तालुक्यात विविध गावांमध्ये मुलभूत समस्या सोडविण्यासाठी याहीपेक्षा मोठा निधी खेचून आणू, अशी ग्वाही बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके यांनी दिली. या दौऱ्यानिमित्त सोळंके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 19 गावांमधील दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
Comment here