सलमान खान, रणवीर सिंगच्या हजेरीने सोहळ्याला चार चाँद
पणजी (गोवा) : राजधानी पणजीत भारताच्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शनिवारी दिमाखदार सोहळ्यात प्रारंभ झाला. या महोत्सवात भारतीय अभिनेत्यांसह देश-विदेशातील नामवंत दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, अभिनेत्रींसह प्रसार माध्यम प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला आहे.
भारताचा ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या चित्रपट महोत्सवात चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. यापैकी अनेक सेलिब्रिटी मंचावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. या सोहळ्यात सलमानच्या दबंग डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्यासोबत रणवीर सिंगनेही आपल्या अप्रतिम ऊर्जेने मेळाव्यात भर घातली. गोव्यात हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात सलमान खानच्या नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. दबंगच्या ‘हुड हुड दबंग’ या गाण्यावर सलमानने फुल स्टाईलमध्ये डान्स केला. त्याची स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपट महोत्सवाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये सलमान खानचा डान्स परफॉर्मन्स दिसत आहे. ग्रुप डान्सर्ससोबत सलमान दबंगची सिग्नेचर स्टेप करतोय. पहिल्या दिवशीचा सलमानचा डान्स हा शेवटचा परफॉर्मन्स होता. याशिवाय रणवीर सिंगनेही आपल्या एनर्जीने तेथील वातावरण प्रसन्न केले. नेहमीप्रमाणेच त्याच्या कामगिरीमध्ये पूर्ण एनर्जी दिसून आली. ‘कर हर मैदान फतेह’ या गाण्यावर श्रद्धा कपूरने मस्त डान्स केला. सलमान खान आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय श्रद्धा कपूर, मौनी रॉय, जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स दिला आहे. या सोहळ्याला मोठे नेते आणि कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करण जोहर आणि मनीष पॉल यांनी केले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमारे 73 देशांतील 148 चित्रपटांचा समावेश असेल. 12 जागतिक प्रीमियर्स आणि सात आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, 26 आशिया प्रीमियर्स आणि सुमारे 64 भारतीय प्रीमियर्स होतील.
हेमा मालिनी यांना जीवनगौरव
या कार्यक्रमात हेमा मालिनी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी एएनआयला सांगितले की, ‘हे माझ्या अनेक वर्षांच्या श्रमाचे फळ आहे. खासदार असतानाही मी मथुरेत विविध कामे करत आले आहे, त्यामुळे त्याचा प्रेक्षकांवरही परिणाम होतो कारण आधी मी डान्सर आहे, नंतर चित्रपट कलाकार आणि आता खासदार आहे.’
Comment here