मंगल क्लिनिकचे डाॅ.ऋषीकेश केकान यांचे आवाहन
माजलगाव : मंगल नस क्लिनिकच्या वतीने रविवार, दि.५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा गरजू आणि गरीब रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंगल क्लिनिकचे संचालक डाॅ.ऋषीकेश मोहन केकान यांनी केले आहे.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीराला थेरपीस्पेशालिस्ट तथा नस विकार तज्ज्ञ डाॅ.काशिनाथ ताठे (औरंगाबाद), डाॅ.रविंद्र ढाकणे (औरंगाबाद) यांची उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरात मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, वात, पॅरॅलिसिस, चिकणगुनिया, मुळव्याध, अर्धांगवायू व नसाच्या कोणत्याही आजारावर मार्गदर्शन व उपचार केले जातील, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक डाॅ.ऋषीकेश केकान यांनी दिली. हे शिबीर मंगल नस क्लिनिक, एचडीएफसी बँकेसमोर, देवदया काॅम्लेक्स, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव जि.बीड येथे होणार आहे. दरम्यान, ऑपरेशनच्या करण्याच्या विचारात असाल तर या शिबीराला आवर्जून भेट द्या आणि सल्ला घ्या, असे आवाहन डाॅ.ऋषीकेश केकान यांनी केले आहे.
Comment here