महा-राष्ट्र

रूईकर कुटुंबियांच्या मदतीला धावले मंत्री एकनाथ शिंदे

पाच लाखांची केली तात्काळ मदत; घर बांधून देण्याचेही दिले आश्वासन 

बीड : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर मंत्री म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, असे राज्याचे नगरविकास मंत्री, ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून बीड येथील अकाली निधन झालेले निष्ठावंत शिवसैनिक सुमंत रूईकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत सुपूर्त केली. दरम्यान, रूईकर कुटुंबीयांना घर देखिल बांधून देणार असल्याची ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी रूईकर कुटुंबीयांना भ्रमणध्वनीवरून दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी तिरूपतीला जाताना शिवसैनिक सुमंत रूईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला शिवसेनेकडून मदतीचा हात मिळाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी रूईकर यांचे संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी घेतली असून आज मंगळवार, दि.२८ डिसेंबर रोजी प्राथमिक स्वरूपात त्यांना पाच लाख रूपयांची रोख मदत केलीय. मंत्री शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे रूईकर यांच्या कुटुंबाशी संवाद साधत त्यांना आधार दिला. लवकरच घर देखिल बांधून देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आज दिलेली मदत शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पाच लाखांच्या निधीमुळे रूईकर कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेची निष्ठा न सोडणाऱ्या सुमंत रूईकरांचे योगदान आम्ही कदापीही विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी दिली.

Comment here