किमान योजनेच्या वंचित गंगाबाई केकान यांचे आजपासून उपोषण
धारूर : शेकडो अर्ज देवून प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही चाटगावच्या गंगाबाई केकान पी.एम.किसान योजनेतून वंचित राहील्या आहेत. पाषाण दगडालाही पाझर फुटेल मात्र शासनाला नाही, अशी प्रतिक्रिया ‘वर्तमान’शी बोलताना गंगाबाई केकान यांनी दिली आहे. दरम्यान, त्या सोमवार दि.२४ जानेवारी रोजी धारूर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.
पी.एम.किसान योजनेत नाव नसल्यामुळे दि.२४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणास बसत असल्याबाबत अर्जदार गंगाबाई दामोदर केकाण रा.चाटगाव यांनी तहसिलदार यांना उपोषणाचा अर्जाद्वारे इशारा दिला आहे. श्रीमती गंगाबाई दामोदर केकाण चाटगाव ता.धारूर जि.बीड येथील रहिवाशी असून कुटुंबप्रमुख आहेत. कुटुंबात फक्त माझ्याच नावावर जमीन आहे. असे त्यांनी अर्जाद्वारे म्हटले आहे. पी.एम.किसान योजना चालू झाली तेंव्हापासून आमच्या गावाचे तलाठी यांना वेळोवेळी भेटलोत त्यासाठी लागणारे कागदपत्र दिले व नंतर तहसिल कार्यालय धारूर येथे गेली २ वर्षांपासून भेटतोत अर्ज व निवेदन दिले. असे ही त्यांनी अर्जाद्वारे तहसिलदारांना कळविले आहे.
Comment here