माजलगाव : ‘आधुनिक विचारांचे वर्तमान’ या वृत्तपत्राने सामाजिक जाणिवा जपत माजलगाव मतदारसंघ आणि जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता रूजविली, असे गौरवोद्गार तुळजाभवानी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ यांनी गुरूवारी माजलगाव येथे काढले. वर्तमान माध्यम समुहाने प्रसिद्ध केलेल्या अभिष्टचिंतन अंकाचे चंद्रकांत शेजुळ यांनी प्रकाशन करून वर्तमान टीमचे कौतुक केले.
Comment here