आपला जिल्हा

धारूर तालुक्यातील १०० विहिरींचा शेतकऱ्यांना लाभ

आमदार प्रकाश सोळंके, जयसिंह सोळंके यांच्या प्रयत्नांना यश

धारूर : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रकाश सोळंके विकासाला गती देणारे नेतृत्व असून, त्यांच्या प्रयत्नाने धारूर तालुक्यातील १०० शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ मिळाला आहे. ७७ विहीरींचे काम पण चालू झाले आहे. उर्वरीत विहीरचे काम लवकरच चालू होतील. यामुळे शेतकऱ्यांतुन आमदार सोळंके यांचे आभार व्यक्त केले आहेत.

धारूर तालुक्यात नुकत्याच एम.आर.ई.जी.एस. योजनेतुन तालुक्यात १०० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. सदर विहीरींचा लाभ शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर झाला असुन, तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून आमदार प्रकाश सोळंके व सभापती जयसिंह सोळंके हे प्रथम पासुनच प्रयत्नशील होते. धारूर तालुका बहुतांश डोंगराळ भाग असून, तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर पिके घेता येत नव्हती .तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली याव्यात त्यांना स्वतः च्या हक्काच्या पाण्यावर शेतात पिके घेता यावेत. म्हणून आमदार सोळंके यांनी या विहीरींना धारूर तालुक्यात जास्तीत जास्त मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळुन तब्बल १०० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील ज्या गावातील शेतकऱ्यांना विहीरी मिळाल्या आहेत. त्यांच्या विहीरींचे खोदकाम ही नुकतेच चालु झाले असुन, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसुन येत असुन, ते आ.सोळंके व सभापती सोळंके यांचे मनोमन आभार व्यक्त करत आहेत. धारूर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विहीरींना मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ असुन, आता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेत जमिनी सिंचनाखाली येऊन, शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. याचे सर्वस्वी श्रेय हे आमदार प्रकाश सोळंके, बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके यांचेच आहे.

मतदारसंघात विकास सुपरफास्ट : भागवत दराडे

माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके, सभापती जयसिंह सोळंके यांचे सतत प्रयत्न असतात. विकास कामात कधीही राजकारणाचा आडपडदा येऊ न देता विकास कामे करण्यावर त्यांचा भर असतो. हे वेळोवेळी दिसुन येते. सोळंके चुलत्या पुतण्यांमुळे धारूर तालुक्यातील तब्बल शंभर शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ मिळाला. हे तालुक्यासाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे. या विहिरी मंजूर करण्यासाठी त्यांनी शासन पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करून तब्बल शंभर विहिरी खेचुन आणल्या. यासह इतरही विकास कामांसाठी सोळंके परिवार नेहमीच अग्रेसर असल्याचे वेळोवेळी दिसतच असतं, आमदार दादा व भैय्या हे विकासाला गती देणारे नेतृत्व असून, त्यांच्यामुळे बारामतीच्या धर्तीवर माजलगाव मतदारसंघात विकास होणार यात शंकाच नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी व्यक्त केली. आमदार प्रकाश सोळंके, बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके यांच्यामुळे माजलगाव मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने विकासाला गती मिळत असल्याचे प्रतिपादनही युवा नेते भागवत दराडे यांनी व्यक्त केले.

Comment here