आपला जिल्हा

‘गोमंत प्रतीक’मधून गोव्याच्या शाश्वत सौंदर्याला प्राधान्य

  1. संघमित्रा अर्बनचे सुभाष घनघाव यांचे गौरवोद्गार 

माजलगाव : ऐरवी गोवा म्हटले की बीच, बार आणि पब संस्कृती दाखवून गोव्याचे अतिरंजित चित्र दाखविले जाते. मात्र गोमंत प्रतीक दिनदर्शिकेच्या माध्यमातून गोव्याचे शाश्वत सौंदर्य प्रकर्षाने पुढे आणले आहे, असे गौरवोद्गार संघमित्रा अर्बनचे अध्यक्ष सुभाष घनघाव यांनी काढले. ते प्रतीक देशमाने फाऊंडेशनने काढलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

गेल्या तीन वर्षांपासून फाऊंडेशनतर्फे गोमंत प्रतीक नावाची दिनदर्शिका प्रकाशित करून गोव्याच्या शाश्वत निसर्ग सौंदर्याला प्राधान्यक्रम दिला जातो. यंदाही गोमंत प्रतीक दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. गोमंत प्रतीकच्या मुखपृष्ठावर गोवा आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्याचे विहंगम चित्र घेतले आहे. सुमारे 1017 फुटांचा दूधसागर धबधबा आहे. भारतातील सर्वाधिक उंच धबधबा असलेल्या दूधसागरचे छायाचित्र दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर घेतल्याने गोव्याच्या शाश्वत निसर्ग सौंदर्याला प्राधान्य दिले आहे. गोमंत प्रतीक दिनदर्शिकेचे संघमित्रा अर्बनचे अध्यक्ष सुभाष घनघाव यांनी कौतुक केले. याप्रसंगी प्रतीक देशमाने फाऊंडेशनचे सचिव तथा पत्रकार बाबा श्रीहरी देशमाने, भगीरथ तोडकरी, संदीप सावंत यांची उपस्थिती होती.

Comment here