आपला जिल्हा

चंद्रकांत शेजुळ ‘मराठाभूषण’ने सन्मानित

माजलगाव : मराठा सेवा संघाच्या वतीने बीड येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यात तुळजाभवानी अर्बन संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ यांना मराठाभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

मराठा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठाभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे हे होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, डाॅ.बालाजी जाधव, वैजनाथ शेळके, संतोष वाळके, पोपटराव जोगदंड, डॉ.गणेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठा सेवा संघ दखल घेतो. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात आले, अशी माहिती अर्जुन तनपुरे यांनी दिली. दरम्यान, चंद्रकांत शेजुळ यांना मराठाभूषण सन्मान प्राप्त झाल्याबद्दल समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comment here