भगीरथ तोडकरी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
माजलगाव : समाजाचे आपण देणेकरी आहोत त्याच भावनेने सामाजिक क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आलापूर-बेलुरा येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.वसिम मनसबदार, जयदत्त नरवडे, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. आदर्श पत्रकार म्हणून ‘वर्तमान’चे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी, कृषी क्षेत्रातून दिशा जोगदंड यांचा शाल, फेटा, स्मृतीचिन्ह देवून पुरस्कार प्राप्त करण्यात आला. ‘जनसामान्यांचा विकासनामा’चा प्रथम वर्धापनदिनानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. श्रीकृष्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने विठोबा रखुमाई अनाथ वृध्द आश्रमाचे उद्घाटन व श्री महादेव मंदिर भूमिपूजन आमदार प्रकाश सोळंके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती संयोजक तथा संपादक बालासाहेब फपाळ यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू खांडेकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.बाळासाहेब महाराज डांगे, किशोर फपाळ आदींनी परिश्रम घेतले. श्रीमद् भागवत कथा व भव्य किर्तन सोहळ्याचे 1 मेपासून आयोजन करण्यात आले आहे. येत्या 8 मे रोजी या सोहळ्याची सांगता होणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक बालासाहेब फपाळ यांनी केले आहे.
Comment here