आपला जिल्हा

माजलगावात उद्यापासून कृषी जागर

सरपंच परिषद, पुरस्कार वितरण सोहळा : दि मराठवाडा अर्बनकडून आयोजन

माजलगाव : मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या स्थलांतर सोहळ्यानिमित्त दि मराठवाडा अर्बन आणि मराठवाडा ॲग्रोटेक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा कृषीमहोत्सवाचे आयोजन ६, ७ व ८ मे रोजी करण्यात आले आहे. यामध्ये कृषी पुरस्कार, सरपंच परिषद, चांडाळ चौकडीच्या करामतीसह कृषी विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दि मराठवाडा अर्बन स्थलांतर व उद्घाटन सोहळा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहावे व लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन सतिष सावंत यांनी केले आहे. दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजता मराठवाडा अर्बन मुख्य कार्यालय उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून आमदार प्रकाश सोळंके हे तर अध्यक्षस्थानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक हे राहणार आहेत. यावेळी काकासाहेब कोयटे, विकास जगदाळे, संभाजी शेजुळ, अच्युत लाटे, अभिनाथ शिंदे, शिवाजी कपाळे, कडुभाऊ काळे, आर.जी.कानडे यांची उपस्थिती राहणार आहे. यानंतर कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थांनी माजी आमदार मोहनराव सोळंके, छत्रपती कारखान्याचे मोहन जगताप, जय महेशचे गिरीष लोखंडे, बाबुराव पोटभरे, माधव निर्मळ, शिवाजी रांजवण, तुकाराम येवले, उमेश मोगरेकर हे उपस्थित असणार आहेत. वरिष्ठ शास्त्रज्ञ पुणे डॉ.रमेश हापसे यांचे ऊस जाती व नियोजन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. रात्री ७ वाजता जल्लोष चांडाळ चौकडीच्या करामतीचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. दि.७ मे रोजी सरपंच परिषद कार्यक्रमास भास्करराव पेरे पाटील, कांतराव देशमुख हे मार्गदर्शक, तर बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, अध्यक्षस्थांनी भाजपा नेते रमेशराव आडसकर उपस्थित असणार आहेत. उपस्थित राहावे असे आवाहन दि मराठवाडा अर्बनचे अध्यक्ष सतिष गंगाधर सावंत, मुख्याधिकारी गजानन ढासाळकर सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, पिग्मी एजंट यांनी केले आहे.

Comment here