सहाय्यक फौजदार जे.एस.वावळकर यांचे निधन
माजलगाव : येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जे.एस.वावळकर यांचे बुधवार 25 मे रोजी सकाळी 11:15 वाजता माजलगाव येथे आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मूळगावी कारी (ता.धारूर, जि.बीड) येथे अतिशय शोकाकुल वातावरणात सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीडचे पोलिस उपनिरीक्षक जाधवर, कांबळे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब बिनकडे, माजलगावचे सहाय्यक फौजदार नरवडे यांनी श्रद्धांजली वाहिली. अतिशय मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वावळकर यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी कारी येथील सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वावळकर यांच्या पाठिमागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परीवार आहे. वावळकर परिवारावर कोसळलेल्या दुखाःत वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.
Comment here