आपला जिल्हा

‘सर्व जग सुंदर बनवण्याची शक्ती महिलांमध्ये’

माजलगाव : घर परिसर गाव देशच नव्हे तर संपूर्ण जग सुंदर बनवण्याची शक्ती महिलांमध्ये आहे या बाबतीत महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनी तर सर्वात अग्रेसर आहेत, असे मत शिवसेना संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांनी व्यक्त केले. ते शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते, याप्रसंगी मंचावर जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव व महिला आघाडी तालुकाप्रमुख राजश्रीताई जाधव उपस्थित होते.

 तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सौ.राजश्रीताई आप्पासाहेब जाधव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी (शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख ), धोंडू पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थिती श्री आप्पासाहेब जाधव (शिवसेना बीड जिल्हा प्रमुख) हे होते. या गौरी सजावट स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील सुमारे 1240 महिलांनी सहभाग नोंदवला होता. ग्रामीण तथा शहरी भागातील बहुसंख्या महिला उपस्थित होत्या. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ खेळण्यात आले. त्यापैकी काही विजेत्या महिलेस पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक – सौ.माधवी विठ्ठलराव सोळंके (माजलगाव), द्वितीय क्रमांक – सौ.आशा आतुल सोनी (माजलगाव), तृतीय क्रमांक – सौ.मनिषा संदीप भुतडा, चतुर्थ क्रमांक – सौ.यशोदा सुखदेव पवार (लोणगाव) तर उत्तेजनार्थ पारितोषिक राजश्री अजिंक्य शिंदे (माजलगाव), शोभा हरिप्रसाद मोदाणी (माजलगाव), मंगल गंगाधर गायकवाड (छोटे वाडी), शिवकन्या रतन जमदाडे (माजलगाव), कमलताई साळुंके (माजलगाव) यांना देण्यात आले. होम मिनिस्टर खेळ घेण्यात आला त्यात प्रथम क्रमांक – आशा अतुल सोनी (माजलगाव), द्वितीय क्रमांक – पुजाताई मुंडकर (माजलगाव), तृतीय क्रमांक – ऐश्वर्या सुनिल धोतरे (माजलगाव) याप्रसंगी उपस्थित होते.

Comment here