आपला जिल्हा

युवा नेते जयसिंग सोळंके मोरेश्वराचरणी लीन

गंगामसला येथील हरिनाम सप्ताहाला दिली भेट

माजलगाव : माजी जिल्हा परिषद सभापती, युवा नेते जयसिंग सोळंके यांनी गणेश जन्मोत्सव निमित्ताने गंगामसला येथील प्रसिद्ध मोरेश्वराचे दर्शन घेतले.

तालुक्यातील गंगामसला येथील गोदाकाठी वसलेले मोरेश्वराचे मंदिर हे या गावचे धार्मिक वैभव आहे. यावेळी नजर जाईल तिथपर्यंत तुडुंब गर्दीची अनुभूती मिळाली. यावेळी मनोभावे मोरेश्वराच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालो, अशी प्रतिक्रिया जयसिंग सोळंके यांनी दिली.

गेल्या एका तपापासून गणेश जन्मोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गंगामसला येथे होतो आहे. रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या मधुर वाणीतून रामायण कथा आणि हरिकीर्तन असे स्वरूप यावेळी बघायला मिळाले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सप्ताहाचे नियोजन गावातील तरुण मुलांनी पुढाकार घेऊन केले याबद्दल त्यांचे कौतुक सोळंके यांनी केले.

 

Comment here