आपला जिल्हा

भाजपा नेते मोहन जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगावात महारॅली

नागरिकांनी सहभागी व्हावे नितीन नाईकनवरे यांचे आवाहन

माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते तथा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन बाजीराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव शहरात रविवार, दि.९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मोटारसायकलवर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीस सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी केले आहे.

माजलगाव मतदारसंघामध्ये शेतकरी कष्टकरी सर्व जनतेला कारखान्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या संपन्न करणाऱ्या माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. माजलगाव मतदारसंघात कारखाना काढल्यामुळे शेतकरी स्वाभिमानाने जगत आहे. ऊस उत्पादकांना बाबतीत दबावाचे राजकारण बंद झाले. त्यामुळे आपला मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् झाला. ऊसाच्या भावाची स्पर्धा करून कुठलेही उपपदार्थ नसताना नवीन छोटा कारखाना असताना आपल्या भागातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या दृष्टीने ज्यांनी काम केले. असे माझे मित्र माजलगाव मतदारसंघाचे भाजपा नेते मोहन जगताप यांना उदंड आयुष्य लाभो, अशा सदिच्छा नितीन नाईकनवरे यांनी व्यक्त केल्या. रविवार दि.९ एप्रिल रोजी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते मोहन जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ठेवलेले आहेत. त्यात देवखेडा येथील गोशाळेत चारा व पेंड वाटप, अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिर या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. रविवार, दि.९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शिवप्रताप मंगल कार्यालय येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या भव्य रॅलीमध्ये तरूण, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, मोहन जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी सहभागी व्हावे. तसेच मोटरसायकल रॅली शांततेत व शिस्तित पार पाडावी, असे आवाहन माजी सभापती नितीनराव नाईकनवरे यांनी केले आहे.

असा असणार रॅलीचा मार्ग

मोटारसायकलवर भव्य रॅली ५ वाजता मंगलनाथ मैदान येथून छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मौलाना अबुल कलाम आझाद चौक ते शिवप्रताप मंगल कार्यालय या दरम्यान होणार आहे.

Comment here