छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी परत एकदा आयएएस आदित्य जीवने हे प्रशिक्षणार्थी कालावधीत असताना त्यांची माजलगाव नगरपालिकेत दिनांक १० एप्रिल २०२३ ते १२ एप्रिल २०२३ (५ आठवडे) या कालावधीत मुख्याधिकारी म्हणून पाठवले आहे. त्यानुसार ते आज सोमवार, दि.१० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता नगरपालिका कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारून ते कामाला लागले आहेत. आयएएस आदित्य जीवने यांनी स्वतंत्र पदभार स्वीकारताच माजी नगराध्यक्ष शेख मंजूर, नुमान चाऊस, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, सुधाकर उजगरे, अक्षय धारक आदी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.




Comment here