आपला जिल्हा

ह.भ.प.भरत महाराज पठाडे ‘समाजभूषण’ने सन्मानित

माजलगाव : पंडित केशव महाराज जगदाळे यांचे शिष्य मृदंग विशारद ह.भ.प.भरत महाराज पठाडे यांना खांडवेवाडी ग्रामस्थांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवून दि.७ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी (देवीनगर) येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले भरत महाराज पठाडे हे २००३ पासून वारकरी सांप्रदयात आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षी ते पंडित केशव महाराज जगदाळे यांचेकडे मृदंग शिकण्यासाठी गेले होते. आज महाराष्ट्रभर त्यांची उत्कृष्ट मृदंगवादक म्हणून एक आगळी वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर आषाढी वारीमध्ये मृदंग वादन करतात तर खांडवेवाडी ता.परतुर जि.जालना येथे मागील अठरा वर्षांपासून ते मृदंगाची सेवा देतात. याबद्दल खांडवेवाडी ग्रामस्थ व तरूण मंडळीच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे नामांकित महाराष्ट्रातील किर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांचेसह वारकरी सांप्रदायातील अनेक मंडळींनी अभिनंदन केले आहे.

जन्मभूमीत झाला गौरव 

ह.भ.प.भरत महाराज पठाडे यांची जन्मभूमी घळाटवाडी (देवीनगर) येथे हरिनाम सप्ताहात विठ्ठल-रखुमाई मूर्ती देवून अॅड.पद्माकर गरड, देवकृपा उद्योग समुहाचे विठ्ठल जाधव, जगदीश साखरे, मुंजाबा पवार, मोकींद सायबर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कथा प्रवक्ते ह.भ.प.धर्मे महाराज व कथा श्रवणास भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Comment here