आपला जिल्हा

फुले-आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त चला रक्ताचे नाते जोडूया…

कास्ट्राईब महासंघ आणि संघमित्रा अर्बनचा संयुक्त उपक्रम

माजलगाव : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ माजलगाव आणि संघमित्रा अर्बन माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.१२ एप्रिल बुधवार रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बसस्थानक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ माजलगाव आणि संघमित्रा अर्बनच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, उद्घाटक माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ तर विशेष उपस्थितीमध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब ससाणे, गटशिक्षणाधिकारी गणेश कुलकर्णी, डॉ.यशवंत राजेभोसले, डॉ.बालाजी घनघाव, डॉ.दिनकर मस्के, डॉ.सोनाली घनघाव, डॉ.विजय खळगे, डॉ.प्रणिती पौळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आणि संघमित्रा अर्बन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment here