आपला जिल्हा

भागवत दराडे यांची सीईओंच्या टीममध्ये वर्णी

देवठाणा-जैतापूर ग्रामपंचायत येणार विकासाच्या ट्रॅकवर

बीड : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सीईओ अजित पवार यांनी रचनात्मक काम करणाऱ्या सरपंचांची टीम तयार केली आहे. या टीमच्या माध्यमातून पाणी पुरवठा, स्वच्छता, कृषी, शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. सीईओंच्या टीममध्ये भागवत दराडे यांची निवड झाली असून देवठाणा-जैतापूर या गावांचा सर्वांगिण विकास होणार आहे.

गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातला कारभारी दुरदृष्टीचा आणि रचनात्मक काम करणारा असला तरच गावांचा विकास.होतो. पोपट पवार, भास्करराव पेरे, वैजनाथ तांदळे या सरपंचांनी आपल्या गावांचा कायापालट केला आहे. बीड जिल्ह्यातील गावांचा विकासाच्या बाबतीत कायापालट करण्यासाठी जिल्ह्यातील निवडक सरपंचाची टीम सीईओ अजित पवार यांनी तयार केली आहे. या सरपंचांच्या माध्यमातून सिंचन, कृषी, शिक्षण, पाणी पुरवठा या कामांमध्ये गावांना रोल मॉडेल बनवले जाणार आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अनेक गावे आदर्श आणि विकासाचे रोल मॉडेल बनवण्याचा प्रशासनाचा मनोदय आहे. धारूर तालुक्यातील देवठाणा-जैतापूर या ग्रुप ग्रामपंचायतचा कायापालट करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या भागवत दराडे यांची टीम मध्ये निवड करण्यात आली आहे. दरम्यान गाव आणि परिसराचा विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याचे भागवत दराडे यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन लोकसहभाग व शासन, प्रशासनाच्या मदतीतून शिक्षण, सिंचन, कृषी, पाणी पुरवठा, स्वच्छता यामध्ये गावाला विकासाचे रोल मॉडेल बनवणार असल्याचे भागवत दराडे म्हणाले.

Comment here