माजलगाव : तालुक्यातील राजेवाडी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदाची निवड शनिवारी पार पडली यामध्ये मोहन जगताप यांचे निकटवर्तीय असणारे बाबासाहेब मारोतराव थेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राजेवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानोबा जाधव यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे चेअरमनपद रिक्त झाले होते. शनिवारी चेअरमन पदासाठीची निवडीची प्रक्रिया सुरू होताच तालुक्यातील मातब्बर नेते मंडळींनी या निवडणुकीमध्ये आपआपली प्रतिष्ठापणाला लावली होती. यामध्ये मोहन जगताप यांनी बाजी मारत या सोसायटीच्या चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आणली या निवडणुकीचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर होणार असल्याचे दिसून येईल. चेअरमनपदाची निवड पार पडल्यानंतर मोहन जगताप यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोहन जगताप यांच्या वतीने संचालक संतोष यादव, भास्कर कचरे यांनी नवनिर्वाचित चेअरमन बाबासाहेब मारोतराव थेटे यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभावेळी सोसायटीचे संचालक मधुकर गोजे, नामदेवराव थेटे, मारुती थेटे, पप्पू शेळके, अंजनराव आव्हाड, रामेश्वर नवले यांच्यासह माजी चेअरमन राजेभाऊ थेटे, माजी सरपंच साहेबराव आव्हाड, श्रीकृष्ण थेटे, शिवाजी जाधव, दीपक राऊत, जालिंदर साबळे, गुलाब खांडवे, अशोक खांडवे, पत्रकार दयानंद खंडागळे, बाळा आव्हाड, बाळू सोनपसारे सह गावातील कार्यकर्ते, गावकरी मंडळी उपस्थित होते.
Comment here