ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवार, दि.१९ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत अमरनाथ टॉवर, देवीचा माळ रोड, करमाळा येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये नेत्ररोग, हृदय रोग, कर्करोग, बालरोग, किडनी रोग आदींसह सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये याविषयी अकलूज येथील प्रसिद्ध डॉ.श्रद्धा जवंजाळ तपासणी करून लसीकरणाची नोंदणी करणार आहेत. यावेळी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांचा सत्कार सभा मंडपात करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माने (नरसिंहवाडी) हेरवाडकर यांचे कीर्तन होणार आहे. या दोन्ही उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करमाळा तालुका पत्रकार संघाने केले आहे.
Comment here