आपला जिल्हा

‘आरोग्यदूत’ शासन आणि सामान्य जनतेचा दुवा व्हावे 

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचा आशावाद

बीड : ‘आरोग्यदूत’ राज्य शासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा बनावे, असा आशावाद बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी गुरूवार, दिनांक २० एप्रिल रोजी व्यक्त केला. दरम्यान, याप्रसंगी आरोग्यदूत मासिकाच्या कामाबाबत विस्तृत चर्चा केली.

संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होत असलेल्या ‘आरोग्यदूत’चा अंक बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना संपादक बाबा श्रीहरी देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी यांनी भेट दिला. आरोग्यदूत अंकाची प्रशंसा करताना हे मासिकपत्र शासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केली. ‘आरोग्यदूत’चे संपादक बाबा श्रीहरी देशमाने यांनी आरोग्यदूत बाबत विस्तृत माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना दिली.

बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना ‘आरोग्यदूत’विषयी विस्तृत माहिती देताना संपादक बाबा श्रीहरी देशमाने.

Comment here