आपला जिल्हा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सचिवपदी अॅड.विजय मस्के

उपाध्यक्षपदी रविकांत उघडे तर संघटकपदी सुहास बोराडे

माजलगाव : महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माजलगाव सचिवपदी सर्वानुमते अॅड.विजय मस्के यांची निवड करण्यात आली. दरम्यान, मस्के यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश‌ संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची येणाऱ्या काळासाठी बांधणी सुरू असून सोमवार, दि.१७ एप्रिल रोजी विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या उपस्थितीत, प्रा.सुदर्शन स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली माजलगाव तालुक्याची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते पुन्हा एकदा अॅड.विजय मस्के यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सलग तिसर्‍यांदा तालुका सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी रविकांत उघडे व संघटकपदी सुहास बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीला जेष्ठ पत्रकार पद्माकर देशमुख, किसन भदर्गे यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Comment here