आपला जिल्हा

सोळंके कारखान्याचे १० लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट : आमदार प्रकाश सोळंके

माजलगाव : मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याने यंदाच्या हंगामात १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट पार करण्यासाठी कारखान्याच्या सर्व यंत्रणांनी परिश्रम घेऊन उद्दिष्ट पार पाडावे, असे आवाहन साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.

तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या ३२ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वांगी येथील नारायणबाबा संस्थानचे अध्यक्ष एकनाथ महाराज माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक धैर्यशील सोळंके यांच्यासह चेअरमन विरेंद्र सोळंके, व्हाईस चेअरमन जयसिंग सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास सर्व संचालकांसह औदुंबर सावंत, जयदत्त नरवडे, लालासाहेब तिडके, रामप्रभू सोळंके, डॉ.वसिम मनसबदार, दीपक लगड, बाबुराव धुमाळ, अंगद फपाळ, कार्यकारी संचालक रविंद्र बडगुजर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment here