आपला जिल्हा

मुंबईतील दसरा मेळाव्यात १० हजारांवर शिवसैनिकांनी घेतला अल्पोपहाराचा लाभ

आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचे नियोजन 

मुंबई : येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आलेल्या शिवसैनिकांना धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, या अल्पोपहाराचा १० हजारांवर शिवसैनिकांनी लाभ घेतला, अशी माहिती संयोजकांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचे दसरा मेळाव्यातील मार्गदर्शन ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखों शिवसैनिकांचा जनसागर लोटला होता. सभेत आलेल्या शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून शिवसैनिकांसाठी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याचा १० हजारांवर शिवसैनिकांनी लाभ घेतला. मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून मोफत अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी याचा लाभ घेतला. धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर, निखिल मस्के, सतिश शिंदे, संदीप माने, अरुण घुमरे, विलास मस्के, प्रसाद चव्हाण, कृष्णा यादव, सुनील चव्हाण, विश्वनाथ जाधव, विश्वास चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, कृष्णा नागवे, आदींनी चोख व्यवस्था केली.

बाजीराव चव्हाण यांचे होतेय संपूर्ण राज्यभरातून कौतुक

सामाजिक आणि आरोग्य सेवेत राज्यात प्रसिद्ध झालेले तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, साहेब यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण साहेब यांनी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने मोफत अल्पोपहार पिण्याच्या पाण्याची केलेली सोय ही सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. याबद्दल बाजीराव चव्हाण यांचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.

Comment here