आपला जिल्हा

‘सिंघम रिटर्न’ची दिंद्रुडकरांना प्रतीक्षा

पीएसआय विजेंद्र नाचन यांच्या कार्याची ग्रामस्थांना आठवण

Dदिंद्रुड : दिंद्रुड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पीएसआय विजेंद्र नाचन यांच्या प्रभावी कामाची आठवण दिंद्रुडकरांना वारंवार येत आहे. दरम्यान, सिंघम स्टाईलने परिसरातील अवैध धंद्यांचा कर्दनकाळ ठरलेले विजेंद्र नाचन यांची दिंद्रुडला बदली व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.



दिंद्रुड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पीएसआय विजेंद्र नाचन ऊर्फ सिंघम यांनी आपल्या अल्पकाळातील सेवेतून दिंद्रुडकरांची मने जिंकली. नाचन यांच्या सिंघम स्टाईलमुळे परिसरातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले होते. हातभट्टीसह इतर अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले होते. नाचन यांच्या कार्यकाळात वाहतूक व्यवस्थेसह कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली होती. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची दिंद्रुडकरांना प्रतीक्षा लागली आहे. बीड येथे बदली झालेले पीएसआय विजेंद्र नाचन यांनी पुन्हा दिंद्रुड पोलीस ठाण्याला रूजू होण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची दिंद्रुड येथे बदली करावी अशी मागणी दिंद्रुड पंचक्रोशीतून होत आहे.

एपीआय अनिल गव्हाणकर यांच्यासमोर अवैध धंद्यांचे आव्हान

दिंद्रुड पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गावांत विविध अवैध धंदे डोके वर काढत आहेत. हातभट्टी दारूसह वाळु तस्करी आणि अवैध वाहतूक अक्षरशः बोकाळली आहे. परिसरातील वाढते अवैद्य धंदे रोखणे दिंद्रुडचे एपीआय अनिल गव्हाणकर यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. दिंद्रुड परिसरात सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांना अभय कुणाचा असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत.

Comment here