आपला जिल्हा

‘वर्तमान’ म्हणजे सकारात्मक पत्रकारिता

मंगेश चिवटे यांचे गौरवोद्गार; वर्तमान फाऊंडेशनचा सन्मान सोहळा थाटात

Mमाजलगाव : सकारात्मक पत्रकारिता म्हणजे वर्तमान माध्यम समूह हे समीकरण अल्पावधीत रूढ झाले आहे. समाजाचे आपण देणेकरी लागतो या भावनेतून सामाजिक क्षेत्रात उतरलेल्या वर्तमान फाऊंडेशनचे कार्य दखल घेण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे (मुंबई) यांनी माजलगाव येथे शुक्रवारी ‘वर्तमान’च्या सन्मान सोहळ्यात काढले. दरम्यान, वर्तमान फाऊंडेशनचा सन्मान सोहळा अतिशय थाटात पार पडला.



वर्तमान फाऊंडेशन आयोजित सन्मान सोहळ्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हा परिषद सभापती कल्याण आबुज, शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजलगाव (जि.बीड) येथील व्यंकटेश काॅन्फरन्स हाॅलमध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यात माधव निर्मळ (उद्योग भूषण), रमेश सोळंके (समाज भूषण), सारंग मिटकरी (समाज भूषण), सुभाष नाकलगावकर (पत्रकार भूषण), माजलगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन (सहकार भूषण) यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते विविध पुरस्कार बहाल करण्यात आले. यावेळी एनएसएल शुगर्स लिमिटेड संचलित जय महेश शुगर्सचे उपाध्यक्ष गिरीष लोखंडे (उद्योग), डाॅ.यशवंत राजेभोसले (आरोग्य सेवा), डाॅ.प्रसाद कुलकर्णी (आरोग्य सेवा), गौरव ओमप्रकाश शर्मा (समाज सेवा), बाबा श्रीहरी देशमाने (पत्रकारिता), प्रकाश काशिद (पत्रकारिता), दत्ता येवले (वृत्तपत्र सेवा), सोन्या सोळंके (अभिनय) यांचा आपआपल्या क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

प्रस्ताविकपर भाषणात वर्तमान फाऊंडेशनचे सल्लागार तथा जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ म्हणाले, सकारात्मक पत्रकारिता कशी असावी याचा परिपाठ वर्तमान माध्यम समुहाने घालून दिला आहे. ‘वर्तमान’ने भविष्याचा वेध घेणारी पत्रकारिता केली असून बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेत वेगळे स्थान निर्माण केले आहे, याचे श्रेय ‘वर्तमान’चे संपादक भगीरथ तोडकरी, ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने आणि वर्तमान टीमला जाते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले, वर्तमान माध्यम समूह आणि वर्तमान फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असणाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला. ‘वर्तमान’ची पत्रकारिता विकासात्मक असून माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार वृत्तपत्र निघत आहे. या वृत्तपत्राने भविष्यात नावलौकिक करावा, अशा शब्दांत सदिच्छा व्यक्त केल्या. समाजकल्याण सभापती कल्याण आबुज म्हणाले, ‘वर्तमान’चे कार्य अल्पावधीत उल्लेखनीय असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात वेगळेपणाने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान झाला, ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. या सन्मान सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते जयदत्त नरवडे, अॅड.भानुदास डक, पंचायत समितीनेमली सदस्य शशांक सोळंके, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, भाजपा नेते बालासाहेब केकान, माजलगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सचिव संजय सपाटे, उपाध्यक्ष अनंत शेंडगे, सिध्दराज अर्बनचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोळंके, डाॅ.सत्येंद्र दबडगावकर, पत्रकार हरिष यादव यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.रमेश गटकळ यांनी केले तर आभार वर्तमानचे संपादक तथा वर्तमान फाऊंडेशनचे अध्यक्ष भगीरथ तोडकरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्तमान टीमचे सदस्य चंद्रकांत जाधवर, शेख ताहेर, अच्युत लिंगायत, गणेश शिंदे, प्रशांत सातपुते, कृष्णा कानडे, सचिन पट्टेकर, महेश बोटवे, गोविंद देशमाने, अभिजित कोंबडे, ज्ञानेश्वर अंबुरे पाटील, ॠषी गोळेकर, दीपक गडसिंग, प्रदिप तांबे, अभिजित देडे, तुकाराम कळसाईतकर, विजय पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘वर्तमान’चे वृत्तपत्र क्षेत्रात दमदार पाऊल : माधव निर्मळ

सन्मान सोहळ्याला उत्तर देताना माधव निर्मळ म्हणाले, वर्तमान माध्यम समूहाचे सल्लागार संपादक चंद्रकांत शेजुळ यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांनी वर्तमानच्या माध्यमातून वृत्तपत्र क्षेत्रातही दमदार पाऊल टाकले आहे. वर्तमानचा अधिक विस्तार करावा सामाजिक बातम्यांना अधिक प्राधान्य द्यावे, हे वृत्तपत्र लवकरच दैनिक स्वरूपात प्रसिद्ध व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डाॅ.यशवंत राजेभोसले, सोन्या सोळंके यांनाही आपले मनोगत व्यक्त केले.

‘वर्तमान’च्या संकेतस्थळाचे लोकार्पण

‘आपले वृत्तपत्र, आपला आवाज’ हे ब्रीद घेवून पत्रकारितेत सक्रीय झालेल्या वर्तमान माध्यम समुहाने एक पाऊल पुढे टाकत आपल्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे, या संकेतस्थळाचे लोकार्पण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संकेतस्थळाशी कनेक्ट राहण्यासाठी www.vartmannews.in वर क्लिक करा.

Comment here