नागरिकांनी उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : रूग्णसेवक बाजीराव चव्हाण
बीड : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन रूग्णसेवक बाजीराव चव्हाण यांनी केले आहे.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आरोग्यमंत्री डाॅ.तानाजी सावंत साहेब यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील शेकडो रूग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ झाला आहे. धर्मवीर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्यमंत्री महोदयांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारामुळे अनेक गरजू आणि गरिब रूग्णांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील गरिब सामान्य रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची टीम कार्यरत केली आहे. मुख्यमंत्री महोदय यांचा सकारात्मक आरोग्य सेवेचा वसा पुढे चालविण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपानजी भुमरे, आरोग्यमंत्री डाॅ.तानाजी सावंत, कृषिमंत्री धनंजयजी मुंडे, आमदार सुरेशजी धस, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संजयजी सिरसाट, आमदार रमेशजी बोरनारे, आमदार लक्ष्मणजी पवार, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार प्रदिपजी जैस्वाल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईदजी खान, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत आदी मान्यवर उपस्थिती राहणार आहेत. दरम्यान, हे संपर्क कार्यालय मुक्ताई बिल्डिंग, मुक्ता लाॅन्स, रेणू हाॅस्पिटलसमोर कर्यरत करण्यात आले आहे, येथे वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधावा असे अवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीडच्या वतीने करण्यात आले आहे.
ऐतिहासिक बीड नगरीत मुख्यमंत्र्यांचे होणार जंगी स्वागत
बीड या ऐतिहासिक नगरीत महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत असून त्यांचे जिल्ह्यावासियांच्या वतीने जंगी स्वागत होईल, असे आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
Comment here