समाज बांधवांनी उपस्थित रहावे; मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज
माजलगाव : सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठ संस्थान माजलगावतर्फे येत्या शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी गंगामसला येथील नूतन वास्तुचे उद्घाटन आणि वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मठाधिपती श्री.ष.ब्र.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली आहे.
माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्वाचार्य लिंगैक्य ष.ब्र.१०८ श्रीगुरू तपोरत्नं प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांचा जयंती समारोह शनिवार, दि.२ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. लिंगैक्य ष.ब्र.१०८ श्रीगुरू तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या स्मरणार्थ आणि श्री.ष.ब्र.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजाती यांचा वधू-वर परिचय मेळावा होत आहे. तसेच गंगामसला येथील वास्तुचे पूजन होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित शिवाचार्य श्री.ष.ब्र.१०८ सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी (शिखर शिंगणापूर), श्री.ष.ब्र.१०८ शंभुलिंग शिवाचार्य स्वामीजी (अंबाजोगाई), श्री.ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी (सोनपेठ), श्री.ष.ब्र.१०८ डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी (मुखेड), श्री.ष.ब्र.१०८ अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी (जिंतूर), श्री.ष.ब्र.१०८ सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी (देवणी), श्री.ष.ब्र.१०८ चन्नबसव शिवाचार्य स्वामीजी (बर्दापूर) आदी शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.२२ डिसेंबर २०२३ सकाळी १०.०० पासून ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम संस्थान मठ गंगामसला ता.माजलगाव जि.बीड येथे होणार आहे. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.
वधू-वर परिचय मेळाव्याचेही आयोजन; नोंदणीसाठी संपर्क साधावा
वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा आणि वास्तु पूजन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. समाज बांधवांनी वधू-वर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदविण्यासाठी राजाभाऊआप्पा लोखंडे (मो.9049948161), विकासआप्पा पाटील (मो.9637184708), सुचेंद्रअप्पा महाजन (मो.8275003152), रामेश्वरआप्पा काटकर (मो.9822141428), नितीनअप्पा शेटे (मो.9421162667), प्रशांतआप्पा शेटे (मो.9175089898), संजयअप्पा मोगरेकर (मो.9890718888), विकासआप्पा लांडगे (मो.9021224140) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री संस्थान मठ माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव, महिला मंडळ माजलगाव व समस्त ग्रामस्थ मंडळी गंगामसला यांनी केले आहे.
Comment here