आपला जिल्हा

दत्तात्रय तोडकरी हे प्रामाणिक आणि कष्टाळू स्वयंसेवक

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे गौरवोद्गार 

माजलगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तात्रय तोडकरी हे प्रामाणिक आणि कष्टाळू स्वयंसेवक आहेत. राष्ट्रभक्तीच्या भावनेतून हिंदुत्वाचे संघटन जोडण्यासाठी तोडकरी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी माजलगाव येथे काढले. ते दत्तात्रय तोडकरी यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन वाढदिवस सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते रमेश आडसकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगाव बाजार समितीचे माजी उपसभापती अच्युतराव लाटे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना हरिभाऊ बागडे म्हणाले, दत्तात्रय तोडकरी यांनी ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम अतिशय तळमळीने केले. आज दत्तात्रय तोडकरी यांचा अमृत महोत्सव अर्थात ७५ वा वाढदिवस होत आहे. भविष्यात त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरनाथ खुर्पे यांनी केले. दरम्यान, श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दत्तात्रय तोडकरी यांना शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी रमेश आडसकर, अच्युतराव लाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित खिंडरे तर आभार अनंतराव जगताप यांनी मानले. यावेळी भिकचंद दुगड, डाॅ.तोष्णीवाल, मन्मथआप्पा भोगावकर, बबनआप्पा खुर्पे, ओमप्रकाश वाकळे, रामेश्वर झंवर, आग्रे गुरूजी, रामलिंग कुलकर्णी, प्रल्हादआप्पा मिटकरी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा यशस्वी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकरआप्पा शेटे, शिवशंकर तोडकरी, उमाशंकर तोडकरी, नायगावआप्पा पळसे, दीपक तोडकरी, गणेश तोडकरी यांनी परिश्रम घेतले.

हरिभाऊजी बागडे सहकारी लाभले हे भाग्य समजतो : दत्तात्रय तोडकरी

अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय तोडकरी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता माझे सर्व समकालीन केवळ विचाराने भारावून जाऊन करत आले. माझे सद्भाग्य समजतो की, हरिभाऊजी बागडे हे सहकारी लाभले. संघाच्या मुशीत अनेकजण देशभक्ती भावनेतून काम करत आलो. याचा सार्थ अभिमान वाटतो, असे तोडकरी म्हणाले.

 

Comment here