बीड : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी परळी वैद्यनाथ येथे आले असता आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्या टीमच्या वतीने जंगी स्वागत केले.
शासन आपल्या दारी या राज्य सरकार आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे परळी शहरात आगमन झाल्यानंतर बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर, कृष्णा यादव आदींनी सन्मान केला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीडसह मराठवाड्यात आरोग्यसेवेत उल्लेखनीय कार्य सुरू आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीडच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचे बीड जिल्हा दौऱ्यात जंगी स्वागत करण्यात आले.
Comment here