आपला जिल्हा

लोकन्यायालय ‘वृद्ध महिलेच्या दारी’

दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीशांनी दिला न्याय

माजलगाव : येथील माजलगाव न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरण निकाली निघाले. यामध्ये न्यायालयाने एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेस न्यायालयाबाहेर असलेल्या जागेवर जाऊन तडजोड करत वाटणीपत्र करून दिले.

माजलगाव न्यायालयात लोक अदालत घेण्यात आली यामध्ये अनेक प्रकरण तडजोडीतून निकाली काढण्यात आले. यात एक प्रकरणात धारूर तालुक्यातील गांजपूर येथील उत्तम रामचंद्र सिरसाट व सुरेश रामचंद्र सिरसाट या दोन्ही भावात यांच्यात सर्व्हे नंबर ४८ आ व ४९ आ या जमिनीचा तथाकथीत खरेदीखत रद्द करून अवैध असल्याचे घोषित करणे तथा मनाई हुकूम मिळण्यासाठी दावा करण्यात आला होता. हे प्रलंबित प्रकरण असल्याने न्यायालयाने हे प्रकरण लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवले होते. यावेळी उत्तम व सुरेश यांची आई सावित्रा रामचंद्र सिरसाट या वृद्ध असल्याने व त्यांना दुर्धर आजार असल्याने त्या न्यायालय परिसरात येऊन एका झाडाखाली बसल्या होत्या. त्यांना न्यायालयात येणे शक्य नसल्यामुळे येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याचे न्यायमूर्ती एस.डी. घनवट त्यांनी बाहेर जाऊन या महिलेचा जवाब घेतला व हे प्रकरण तडजोडीतून निकाली काढले. यावेळी अ.जिल्हा सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस.एम हे उपस्थित होते. तर वरिष्ठ लिपिक जी.जी.गरूड, एन.एस.होके यांच्यासह सावित्राबाई सिरसाट यांच्या वतीने अॅड.ए.एम.कुलकर्णी व अॅड.हजी सय्यद यांनी तर प्रतिवादीकडून अॅड.एस.एस.देशपांडे यांनी काम पाहिले.

Comment here