करमाळा : राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश नरसिंह चिवटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, पंढरपूर विभागाचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख चरण राज चवरे, सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे या चौघांची निवड झाली आहे. या निवडीनंतर महेश चिवटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवडीनंतर बोलताना महेश चिवटे म्हणाले की, तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न असून याला वाचा फोडण्यासाठी या पदाचा वापर करणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे.
नवनियुक्त सदस्य महेश नरसिंह चिवटे
Comment here