आपला जिल्हा

इमामपूर म्हसोबा यात्रेच्या कुस्ती दंगलीत राज्यातील नामांकित मल्लांचा सहभाग

भूमिपुत्र बाजीरावजी चव्हाण यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर, भोजन व्यवस्था

बीड : तालुक्यातील इमामपूर येथील प्रसिध्द म्हसोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांची दंगल झाली. स्थानिक मल्लासह राज्यभरातील नामांकित कुस्तीपटुंनी सहभाग घेतला. इमामपुरचे भूमिपुत्र तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू बाजीरावजी चव्हाण यांनी यात्रेनिमित्त आलेल्या मान्यवर अतिथी आणि मल्लांचे स्वागत केले. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अप्पर निबंधक ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्तीच्या दंगलीला प्रारंभ झाला.

यावेळी पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण सभापती चेतन घुले, राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे,पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास भारती, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड आदींची उपस्थिती होती. गावचे भूमिपुत्र तथा धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून यात्रेनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, बीडच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित केले होते. तर यात्रेला येणाऱ्या पंचक्रोशितील ग्रामस्थ, भाविक-भक्तांसाठी भोजन व्यवस्था केली होती. दरम्यान, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दामू थोरात (सरपंच), विश्वनाथ जाधव (उपसरपंच), डाॅ.ज्ञानेश्वर जाधव, फुलचंद नेवाळे (ग्रा.पं.सदस्य), कृष्णा जाधव, हरिदास कदम, मसुराम कदम, विलास चव्हाण, मिट्टू आरेकर, शरद जाधव, सत्यवान चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

आरोग्य शिबिराचा शेकडो भाविक-भक्तांनी घेतला लाभ

धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हाप्रमुख महादेव मातकर आणि टीमने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो भाविक-भक्तांनी लाभ घेतला. यावेळी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. डॉ.प्रशांत गायकवाड, डॉ.मयूर मोरे, डॉ.मंगेश अंधारे, डॉ.बालाजी नवले, डॉ.ज्ञानेश्वर जामकर यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. डॉ.मंगेश अंधारे, डॉ.ऋषिकेश फुंदे, डॉ.विद्या केशगिर, डॉ.सुषमा राख आदींनी दंत चिकित्सा केली.

हजारोंनी घेतला भोजनाचा आस्वाद

यात्रेला येणाऱ्या पंच क्रोशितील ग्रामस्थ, भाविक-भक्तांसाठी आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांनी भोजन व्यवस्था केली होती. दरम्यान, या भोजनाचा हजारोंनी आस्वाद घेतला.

Comment here