आपला जिल्हा

अखंड शिवकथेचा यज्ञ तेवत ठेवा : श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज 

शिवकथेच्या सभामंडपाचे भुमिपूजन; जानेवारीपासुन शिवकथेला प्रारंभ

माजलगाव : शहरामध्ये येत्या १२ जानेवारीपासून शिवकथा व किर्तनमहोत्सव सुरू होणार असून मानवजातीच्या कल्याणासाठी अखंडपणे शिवकथेचा यज्ञ सुरू रहावा, असे आशिर्वचनपर मार्गदर्शन करतांना सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे मठाधिपती गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सांगितले.

शहरातील कौशल्याबाई बजाज मैदानावर शिवकथेच्या सभामंडपाच्या भुमिपूजन बुधवार, दि.१० जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी विठु महाराज गिरी, पूरोहित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनंतशास्त्री जोशी, जेष्ठ गोसेवक रामनिवास मुंदडा, जगदीश चांडक, सुभाष सोळंके, बबन सरवदे, शिवकथेचे मुख्य यजमान नारायण डक, संपादक शिवाजी रांजवण, सुरेंद्र रेदासणी, अच्युत लाटे, नारायण सातपुते, रविंद्र कानडे, तुकाराम येवले, कमलेश जाब्रस, भागवत गायकवाड, धनराज बंब, संजय कोकड, संतोष आब्बड, कैलास येलशेटी, गणेश लोहिया, बंडू इके, विशाल देवकते, जुगलकिशोर नावंदर, भारत होके, लक्ष्मीकांत सोन्नर, विष्णू मुंदडा यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज म्हणाले की, माजलगावकरांसाठी शिवकथा व किर्तनमहोत्सवाचे आयोजन ज्ञानदेव संगीत विद्यालयाचे ह.भ.प.शिवाजी महाराज गडदे व व्यापारी महासंघ, पत्रकार संघ यांच्या पुढाकारातुन होत आहे. संकट आल्यावर व्यंकटरमणा म्हणण्यापेक्षा संकट येवू नये यासाठी हा शिवकथेचा मोठा स्त्युत्य उपक्रम होत आहे. या शिवकथेस सर्वांनी आपआपल्या परिने योगदान करावे असेही आवाहन केले. यावेळी प्रास्ताविकातुन शिवकथा व किर्तन महोत्सवाची माहिती रविंद्र कानडे यांनी सांगीतली. सूत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी केले. सभामंडपाच्या भुमिपूजनाची विधीवत पूजेस विजुदेवा जोशी व महेश खामगावकर उपस्थित होते.

Comment here