आपला जिल्हा

माजलगावात १८ रोजी मूकनायक सन्मान सोहळ्याला जेष्ठ पत्रकार राही भिडे प्रमुख अतिथी

आमदार संदीप क्षीरसागर, वसंत मुंडे, सईद खान, बाबुराव पोटभरे आदी मान्यवरांची उपस्थिती

बाबा देशमाने, दत्तात्रय नरनाळे आदींसह कर्तृत्ववान भूमिपुत्रांच्या होणार सन्मान

माजलगाव : माजलगाव एकता पत्रकार संघाच्या १८ रोजी होणाऱ्या मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळ्याला जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राहीताई भिडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती संयोजक ज्योतिराम पांढरपोटे यांनी दिली.

माजलगाव एकता पत्रकार संघाच्या मूकनायक आणि माजलगाव भूषण सन्मान सोहळा, गुरुवार १८ जानेवारी २०२४ रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता रंगणार आहे. मुकनायक पुरस्कारासाठी निर्भीड पत्रकार, आरोग्यदुतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, बीड येथील दै. मराठवाडापत्रचे संपादक दत्तात्रय नरनाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. माजलगाव भुषण पुरस्कार कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीनराव नाईकनवरे, ॲड.भानुदास डक, रविंद्र कानडे, रामराजे रांजवण, डॉ.गणेश आगे, सरपंच सौ.सिमाताई सोळंके, इम्रान ताहेर सलीम खान, तलाठी सुर्यकांत गवई, ग्रामसेवक महेश गेंदले यांना प्रदान करण्यात येणार आहे.

माजलगाव एकता पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारासह माजलगाव तालुक्यातील सामाजिक कार्यात, आरोग्यरुग्ण सेवेमध्ये, उद्योजक, सहकारासह इतर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या बीड जिल्हा आणि माजलगाव तालुक्याच्या मातीतील व्यक्तीस मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन गेल्या चार वर्षापासून सन्मानीत करण्यात येत आहे. यंदा या कार्यक्रमाचे ५ वे वर्ष असुन यावर्षी पत्रकारीतेतील योगदानाबद्दल निर्भिड पत्रकार तथा आरोग्यदुतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने व बीड दै.मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रय सखाराम नरनाळे हे मुकनायक सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. माजलगाव भुषण पुरस्कारामध्ये कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीनराव नाईकनवरे (सामाजिक) ॲड.भानुदास डक (विधीज्ञ), श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कानडे (सहकार), शितल ज्वेलर्सचे संचालक रामराजे रांजवण (उद्योग), मातोश्री हाॅस्पिटलचे संचालक डॉ.गणेश आगे (आरोग्य), गंगामसला येथील सरपंच सौ.सिमाताई भालचंद्र सोंळके यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान, आमदार प्रकाश सोळंके, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, भाजप रमेश आडसकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत असून या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजलगाव एकता पत्रकार संघाच्यावतीने संयोजक, पत्रकार ज्योतिराम पांढरपोटे, वाजेद पठाण, अमर साळवे, राजेभाऊ पाष्टे, नय्युम आत्तार, वसंत परसे यांनी केले आहे.

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान 

बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे

आरोग्यदूतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने 

दैनिक मराठवाडापत्रचे दत्तात्रय नरनाळे

……………………………………..

या भूमीपुत्रांचा होणार विशेष गौरव

माजलगाव शहरातील भूमिपुत्र राज्यात विविध वरीष्ठ पदावर अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले व राज्यातील विविध भागात माजलगावचा नावलौकिक करणारे अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकजकुमार वसंतराव जावळे, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याचे तहसीलदार डॉ.शिवाजी रामेश्वर मगर व परळी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात सहायक अभियंता-श्रेणी-२ म्हणून कार्यरत असलेल्या इंजि.दिपाली रामदास गिते यांचाही या कार्यक्रमात विशेष गौरव होणार असुन त्यांना माजलगाव भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Comment here