माजलगाव : आमदार प्रकाश सोळंके यांचा वाढदिवस संपूर्ण मतदारसंघात विविध उपक्रमांनी रविवार, दि.१४ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांच्या संकल्पनेतून ग्रंथतुलेने अभिनव वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत क्राॅम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले, असल्याची माहिती शेजुळ यांनी दिली.
आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच वाढदिवस साजरा केला असून, रविवारी त्यांनी सपत्नीक वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या तीनही तालुक्यांमध्ये सरपंच, सेवा संस्था चेअरमन, सिंदफणा शाळेचे कर्मचारी, लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे संचालक, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, माजलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, कल्याण आबूज, चंद्रकांत शेजुळ, डॉ.वसिम मनसबदार, नितीन नाईकनवरे, डॉ.सुरेश साबळे उपस्थित होते.
Comment here