हुरडा पार्टी
Mमाजलगाव : येथील डक परिवाराने गेली 26 वर्षे अखंडीत हुरडा पार्टी आयोजित करून स्नेहभाव जपण्याचे काम केले आहे. समाजातील डाॅक्टर्स, वकिल, पत्रकारांसह घटकांनी हुरडा पार्टीचा आस्वाद घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक हे गेली 26 वर्षे आपल्या शेतात हुरडा पार्टी आयोजित करतात. अखंडीतपणे हुरडा पार्टी आयोजित करून समाजातील विविध घटकांना या माध्यमातून लुप्त होत चाललेल्या हुरडा पार्टीचा आस्वाद दिला. हुरडा पार्टीच्या माध्यमातून डक परिवार स्नेहभाव जपण्याचे काम करत आहे. कृषी संस्कृती सानिध्यात स्नेहभोजन करून आपुलकी वृध्दीसाठी डक परिवार आगळ्या वेगळ्या हुरडा पार्टीचे आयोजन करते. यंदा माजलगावातील पत्रकारांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.
Comment here