मनोरंजन

गंगामसल्याचा सोन्या सरकार चमकतोय ‘चांडाळ चौकडी’त

भगीरथ तोडकरी

Mमाजलगाव : गावातील मारोती पारावरील नाटक ते थेट लोकप्रिय मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडी मध्ये काम करणारा गंगामसला येथील सोन्या सरकार ऊर्फ मोरेश्वर सोळंके हा हरहुन्नरी कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या वाटचालीचे सर्व श्रेय वडील सचिन सोळंके यांना देतो असे प्रांजळ मत वर्तमानशी बोलताना सोन्या सरकार याने मांडले.



चांडाळ चौकडी या लोकप्रिय मराठी वेबसिरीजमध्ये जरशी गण्याची भूमिका साकारणारा सोन्या सरकार महाराष्ट्रासमोर एक उद्योन्मुख कलाकार म्हणून उदयास येत आहे. या निमित्ताने वर्तमानने साधलेल्या संवादात सोन्या म्हणाला गावातील गणपती मंडळाच्या कार्यक्रमात नृत्य आणि नाटकांतून भूमिका केल्या त्यामुळे अगदी बालवयातच कलागुणांची आवड निर्माण झाली यासाठी आईवडिलांनी खंबीर साथ दिली. गावातील नाटकांमधून काम करत असताना वेबसिरीजमध्ये संधी कशी मिळाली यावर बोलताना तो म्हणाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक नवनाथ ढमे यांच्या चांडाळ चौकडी या वेबसिरीजचा मी पहिल्यापासून चाहता होतो. त्यामुळे ढमे यांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी संधी दिली. ढमे यांच्या समवेत काम करत असताना अनेक गोष्टींचे बारकावे अनुभवता आले असेही त्याने सांगितले.

सोशल मिडीया फ्रेडन्ली राहणारा सोन्या सरकार फेसबुकच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देत असतो यातूनच विजय असो..! पेड पत्रकारितेचा.. या वास्तववादी लघुपटाची निर्मिती झाली. त्यानंतर समाजाच्या विषमतेवर बंडाची भाषा करणारा हा हरहुन्नरी कलाकार जगासमोर आला. काही आदर्श अपवाद वगळता पत्रकारितेत पेडन्यूज संस्कृती रूजवणाऱ्या मुळांवर घाव घालण्याचे काम या लघुपटाने केले आहे.



सोन्याचे बारामती कनेक्शन!

गंगामसल्यातील या हरहुन्नरी कलाकाराचे बारामती कनेक्शन लक्षात येणे गरजेचे आहे. विजय असो..! पेड पत्रकारितेचा.. हा लघुपट पाहिल्यानंतर बारामतीचे लेखक माधव बालगुडे यांनी सोन्या एवढा बंडखोर का झाला? हा लेख लिहिला. तर चांडाळ चौकडीचे दिग्दर्शक नवनाथ ढमे हे सुध्दा बारामतीचेच आहेत त्यांनी वेबसिरीजमध्ये संधी सोन्याला दिली. सोन्याचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ते आदर्श मानतात. त्यामुळे सोन्याच्या बारामती कनेक्शनची चर्चा होताना दिसत आहे.

व्हायचे होते पत्रकार, झालो इंजिनिअर..

आपल्या करिअरबाबत सोन्या म्हणतो सुरूवातीपासूनच पत्रकारितेची आवड होती. मात्र इंजिनिअर झालो आणि पुढील आयुष्य कलावंत म्हणून काम करावयाचे आहे. गंगामसल्याचे नाव जगभर नेण्यासाठी आपण कलेच्या क्षेत्रात भरपूर काम करणार आहे. लवकरच एका चित्रपटात संधी मिळाणार असल्याचेही त्याने सांगितले.

Comment here