महा-राष्ट्र

मायभूमीतील शिक्षकांनी केलेला गौरव अधिक प्रेरणादायी : मंगेश चिवटे

ज्या करमाळा या माझ्या जन्मभूमीत मी लहानाचा मोठा झालो तेथील शिक्षकांनी केलेला गौरव हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. येथे शिक्षण घेत असतानाच मला सामाजिक कार्याची गोडी निर्माण झाली. त्यातूनच आम्ही सध्या सरकारच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्यासह इतर अनेक क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख तथा माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी केले.

ते डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आयोजित महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा, राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कार्यक्रम वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी करमाळ्यातील स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, तलवारबाजी, खो-खो, गोळाफेक आदी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले, शिक्षक परिषदेने पुरस्कारांना दिलेली नावे अतिशय समर्पक असून त्यामुळे पुरस्कार्थींना अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. यावेळी सोलापूरचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे , करमाळ्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ, संघटनेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे, सोलापूर शहराध्यक्ष अनिल गायकवाड, शिक्षक समितीचे प्रताप काळे, आदिनाथ देवकते, अमोल राऊत आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत वीर, नवनाथ मस्कर, सोमनाथ पाटील, सुधीर माने, प्रसाद कुलकर्णी, संतोष माने, पोपट पाटील, विकास माळी, शरद पायघन, सुनिल पवार, सागर पुराणिक, महेश निकत, अंकुश सुरवसे, अरुण चौगुले, शरद झिंजाडे, उमराव वीर, प्रवीण शिंदे, लहू चव्हाण, दादासाहेब माळी, संपत नलवडे, अशोक कणसे, दत्तात्रय जाधव, विजय बाबर, रघुनाथ फरतडे, भरत शिंदे, नाना वारे, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शितोळे यांनी केले. प्रास्ताविक अजित कणसे यांनी तर आभार शहाजी रंदवे यांनी मानले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक :

चंपा जगताप (राजुरी), काशिनाथ गोमे (कविटगाव), शंकर लोणकर (सांगवी-२), सचिन शिंदे (जाधववस्ती), हरिदास माने (अवताडेवस्ती), शौकत मणेरी (वडगाव दक्षिण), सतीश कात्रेला (कुंभेज), सुनिता शिंदे (जातेगाव), अंजली निमकर (श्रीदेवीचामाळ), मिराबाई जाधवर (पाडळी), रोहिणी चव्हाण (रावगाव), नवनाथ पारेकर (कै. सीतामाता महादेवरावजी जगताप, न. प. करमाळा), प्रा. डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे (श्री. उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज,केम)

आदर्श शाळा : 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोयेगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोटी

राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार :

मंगेश नरसिंह चिवटे

कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुंबई.

Comment here