महा-राष्ट्र

आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांची सामाजिक बांधिलकी

दिव्यांग दक्ष कासारला व्हीलचेअर भेट; अनाथ आश्रमात ३०० विद्यार्थ्यांना जेवण वाटप       

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यदूत बनलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४ वर्षीय दिव्यांग दक्ष कासारला व्हीलचेअर भेट देण्यात आली. तर चिरनेर येथील ३०० अनाथ बालकांना जेवणाचे वाटप करण्यात आले.

आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साधेपणाने सर्व सामान्य लोकांसोबत साजरा केला. बाजीराव चव्हाण यांच्या कार्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाजीराव चव्हाण यांचा वाढदिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अल्पावधीत आपल्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडणारे सर्व सामान्यांचे आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. मुंबई येथे दक्ष कासार नामक १४ वर्षीय दिव्यांग मुलाला वाढदिवसानिमित्त व्हील चेअर भेट देण्यात आली. यासह चिरनेर येथील ३०० अनाथ मुलांना जेवणाचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः साधेपणाने राहतात त्यांच्या गुणांची व कार्याची बाजीराव चव्हाण यांच्यावर विशेष पकड आहे. सर्वसामान्य लोकांची कामे करताना देहभान हरपून काम करणारे आरोग्य सेवक बाजीराव चव्हाण यांच्या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर नेहमीच घेतली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाजीराव चव्हाण यांचा केक कापण्यात आला. बीड जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांचे आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करताना समाजातील गरजवंतांना मदतीचा एक हात देण्यात आला.

 

Comment here