आपला जिल्हा

शिंदे सरकारच्या संवेदनशीलतेमुळेच आरक्षणाची लढाई जिंकली : बाजीराव चव्हाण 

बीड : मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांचा दीर्घ लढा, मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट आणि सत्तारूढ शिंदे सरकारच्या संवेदनशीलतेमुळे आरक्षणाची लढाई जिंकली, अशा शब्दांत धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, धर्मवीर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बीड शहरात पेठे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करून डीजे लावून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व्यापक आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्याबाबतचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना आज सुपूर्त केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. सत्तारूढ शिंदे सरकार पूर्वीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्पर होते. संवेदनशील शिंदे सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांचा दीर्घ लढा, मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट आणि सत्तारूढ शिंदे सरकारच्या संवेदनशीलतेमुळेच आरक्षणाची लढाई जिंकली, अशा शब्दांत धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांनी सांगितले.

मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण ठरले सरकारचे संवाददूत

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्पर असलेल्या शिंदे सरकारच्या वतीने वेळोवेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, त्यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांनी संवाद साधला. त्यांची शिष्टाई सकारात्मक ठरली आहे. आरोग्यदूत असलेले मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने सरकारचे संवाददूत ठरले आहेत, अशा प्रतिक्रिया राज्यभरातून उमटत आहेत.

धर्मवीर प्रतिष्ठानकडून बीडमध्ये जल्लोष

सरकारने मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे बीड शहरात धर्मवीर प्रतिष्ठानकडून पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करून आणि डीजे लावून सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, धर्मवीर प्रतिष्ठाणचे डाॅ.ज्ञानेश्वर जाधव, मसुराम कदम, अरविंद जाधव, काशीनाथ जाधव, कृष्णा यादव, दिनकर शिंदे, आण्णा शिंदे, राजेंद्र तांगडे, अक्षय घाडगे, आदिनाथ सुर्वे, आनंद शिंदे, विलास मस्के, महेश साळुंके, संदीप माने, पंकज कदम, विश्वनाथ जाधव यांनी जल्लोष साजरा केला.

Comment here