आपला जिल्हा

घरकूलापासून वंचित राहिलेल्या माजलगावकरांनी योजनेचा लाभ घ्यावा : शेख मंजूर

माजलगाव : शहरात पंतप्रधान आवास घरकूल योजना अंतर्गत चौथ्या डीपीआरच्या घरकूल आवास योजनेसाठी नगर परिषदेमध्ये फॉर्म भरना चालू आहे. त्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी नगरपरिषद पंतप्रधान आवास योजना कक्षातून फॉर्म भरना करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे. असे आवाहन माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

माजलगाव नगर परिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या चौथ्या टप्प्यातील फॉर्म भरणा चालु आहे. माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अंदाजे बाराशे घरकुलधारकांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता.उर्वरित वंचित घरकुल धारकांना घरकूल मिळवण्यासाठी आम्ही २९ सप्टेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी माजलगाव कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये शहरात भोगवटदार असणाऱ्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली होती, परंतु ती मान्य मागणी पूर्ण झाली नाही. ही मागणी पूर्ण झाल्यास गोरगरीब भोगवटदारांना या योजनेचा लाभ घेता येईल. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. परंतु मालकी हक्कात असणाऱ्या वंचित लाभार्थ्यांना या आंदोलनाचा फायदा झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे घरकूल योजनेच्या चौथ्या डीपीआरमध्ये माजलगाव नगर परिषदेने घरकुल फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे. तरी या योजनेपासून वंचित असणाऱ्या पात्र नागरिकांनी नगरपरिषदेत असणाऱ्या पंतप्रधान आवास कक्षेत फॉर्म घ्यावे व भरणा करावी. त्याचप्रमाणे आपल्या मालकी हक्काची माहिती त्या फॉर्ममध्ये भरून आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे असे आवाहन माजलगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी केले आहे.

Comment here