श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची माहिती
माजलगाव : वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील विवाह इच्छुकांसाठी श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ माजलगावतर्फे येत्या ६ मे रोजी होत असलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याची नावनोंदणी करावी, असे आवाहन मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी केले आहे.
सिद्धयोगी शिवैक्य श्रीगुरू तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांच्या प्रेरणेने वीरशैव लिंगायत समाजातील विवाह इच्छुक तरूण-तरूणींसाठी अनुरूप वधू-वर परिचय पुस्तिकाही मठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका श्रीक्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आली आहे. गंगामसला येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यातील संभाव्य वधू-वरांची माहिती शिवाय वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील विवाह इच्छुक उमेदवारांचा परिचय देण्यात आलेला आहे. येत्या चैत्र अमावस्येला सदगुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त नियोजित कार्यक्रमात सामुहिक विवाह सोहळा होणार आहे. तरी संबंधितांनी विवाह नोंदणी करण्यासाठी व वधू-वर परिचय माहिती पुस्तिका उपलब्ध असून इच्छुकांनी शिवहारआप्पा महाजन (मो.८२७५८५२८९८) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन श्री संस्थान मठ माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन
श्री संस्थान मठ माजलगावच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ मे २०२४ रोजी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. तर ७ मे २०२४ रोजी शिवदिक्षा कार्यक्रम होणार असून ८ मे २०२४ रोजी सदगुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त संजीवन समाधीस लघुरूद्राभिषेक, रजत पालखी मिरवणूक महोत्सव व कुंभमेळा होणार असल्याची माहिती मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी दिली आहे.
Comment here