मार्च २०२४ अखेर संस्थेकडे ६०१ कोटींच्या ठेवी
माजलगाव : सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तुळजाभवानी अर्बनने ३१ मार्च २०२४ अखेर ६०१ कोटी रूपये ठेवींचा टप्पा यशस्वी केला आहे. हे अभूतपूर्व यश तुळजाभवानी अर्बनचे ठेवीदार, सभासद, खातेदार, ग्राहक आणि हितचिंतकांच्या विश्वासामुळे शक्य झाले आहे, अशी माहिती तुळजाभवानी अर्बनचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात प्रगतीचा मानबिंदू ठरलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव या संस्थेने मोठी गगनभरारी घेतली आहे. ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत ६०१ कोटी ३९ लाख रूपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वी करून पुन्हा ग्राहकांमध्ये विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब केले आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख पाहता कर्ज वितरण ३८३ कोटी गुंतवणूक २७८ कोटी २५ लाख, एन.पी.ए.ग्राॅस ७ टक्के नेट २.९७ टक्के तर निव्वळ नफा १८ कोटी ६२ लाख यात स्वनिधी ५४ कोटी ३४ लाख आहे, अशीही माहिती तुळजाभवानी अर्बनच्या व्यवस्थापनाने दिलेली आहे. सहकार क्षेत्रात वेगळी ओळख आणि प्रगतीचा नवा उच्चांक गाठण्यास तुळजाभवानी अर्बन परिवार यशस्वी झाला आहे, याचे संपूर्ण श्रेय संस्थेचे ठेवीदार, ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांच्या असलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले, असे चेअरमन चंद्रकांत शेजुळ म्हणाले.
सभासदांच्या विश्वासाला सदैव पात्र राहू : चंद्रकांत शेजुळ
३१ मार्च २०२४ ताळेबंदाबद्दल चंद्रकांत शेजुळ म्हणाले, सद्यपरिस्थितीत अनपेक्षितपणे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटमध्ये ठेवलेल्या ठेवी पाहता आणि मिळालेला नफ्याचा विचार करता सभासदांनी दाखवलेला हा विश्वास आहे. आगामी काळातही ग्राहक आणि सभासदांच्या हितासाठी तत्पर राहू, संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सभासदांच्या विश्वासाला सदैव पात्र राहू, अशी ग्वाही चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी दिली.
तुळजाभवानी अर्बनच्या टीमचे मोठे योगदान
सहकार क्षेत्रातील तुळजाभवानी अर्बनच्या यशात ग्राहक, सभासदाप्रमाणेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, सर्व संचालक मंडळ, कोअर टीमचे सदस्य आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे. तुळजाभवानी अर्बनची सक्षम टीम आणि तत्पर अधिकाऱ्यांमुळे संस्था गगनभरारी घेत आहे.
Comment here