आपला जिल्हा

श्री मंगलनाथ संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण : रामेश्वर कानडे

१३ कोटी ८३ लाख रूपये नफ्यासह ६०२.०८ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण

माजलगाव : बीड जिल्ह्यातील सहकार बँकिंग क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्री मंगलनाथ मल्टीस्टेट या संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. दरम्यान, सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतकांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर ३१ मार्च २०२४ अखेर अभूतपूर्व यश संपादन करत १३ कोटी ८३ लाख रूपये नफ्यासह ६०२.०८ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कानडे यांनी दिली.

श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव या संस्थेने गेली २४ वर्षात सभासदांच्या अपेक्षा जाणून कार्य केले आहे. त्यामुळे सभासदांचा बहुमूल्य प्रतिसाद प्राप्त करून गेली २४ वर्ष संस्था अविरत अखंड कार्य करत आहे. संस्थेने ग्रामीण भागापासून ते शहरी भागात शाखांचा विस्तार केलेला असून सर्व शाखा या नफ्यात आहेत. मराठवाड्यातील सर्वात जास्त सोने तारण कर्ज वाटप करणारी एकमेव संस्था म्हणून संस्थेचे नाव यापूर्वीच लौकिक आहे संस्थेची प्रतिमा कायम ठेवून संस्थेने आखलेल्या १००० कोटी व्यवसाय पूर्ततेच्या अनुषंगाने काम करत येणाऱ्या काळात अल्प व्याजदरात जास्तीजास्त सोनेतारण कर्ज वाटप करून सभासदांच्या ठेवीना अधिकाधिक सुरक्षा देण्याचा मूळ उद्दिष्ट संस्थेचे आहे. संस्थेच्या या घवघवित यशाबद्दल संस्थेचे सभासद, हितचिंतक, मित्र परिवार यांच्या सहकार्याबद्दल संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अॅड.रविंद्र कानडे यांनी आभार व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कानडे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, संस्थेने व्यवसाय वाढीसह संस्थेच्या सभासदांच्या ठेवीना सुरक्षा निर्मितीकरीता नेहमीच प्राधान्य दिले आहे. संस्थेचे मार्च २०२४ अखेर एकूण २३३.१३ कोटी कर्ज वाटप आहे. त्यामध्ये सुरक्षित सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस कर्ज, मुदत ठेव कर्ज वाटप असून एकूण कर्जवाटपाच्या ९२.२४ टक्के कर्ज हे सुरक्षित आहे. त्यामुळे निश्चितच सुरक्षितकर्ज वाटपाच्या माध्यमातून सभासदांच्या ठेवींना सुरक्षा कवच निर्माण केले आहे. तसेच संस्थेने कर्ज वसुलीत देखील यश मिळवून एन.पी.ए ६.९९ व नेट एन.पी ए. २.३२ टक्के आहे संस्थेची एकूण गुंतवणूक १२८ कोटी आहे. तर संस्थेचा स्वनिधी ५८ कोटी आहे. या आर्थिक वर्षात संस्थेद्वारे १६२१ कोटी पेक्षा अधिक उलाढाल करून ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्याचे काम संस्थेने केले आहे. पारदर्शक व सुरक्षित व्यवहार करून सभासदांचा विश्वास संपादन करून संस्थेने सभासदांच्या ठेवीच्या सुरक्षिततेला प्राधान्याचा देत कार्य केले म्हणून सभासदांचा संस्थेवरील सदैव असणाऱ्या विश्वासास पात्र राहून २५ व्या वर्षात संस्था दमदार पदार्पण करत आहे.

Comment here