विश्व वार्ता

पणजी नटली; इफ्फी सजली

भगीरथ तोडकरी

Pपणजी : इफ्फी अर्थात भारताचा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्याची राजधानी पणजी येथे शानदार सुरूवात झाली. दरम्यान, इफ्फीच्या स्वागतासाठी पणजी नगरी नटली असून इफ्फी प्रतिनिधी आणि चित्रपट तारक, तारिकांनी इफ्फी सजली आहे.

सिनेमाची अनुभूती भाषेच्या पलिकडची असते आणि इफ्फी ही सिनेमाची जादू अनुभवायला देणारे, केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारे अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिपादन केले. चित्रपट रसिक आणि समीक्षक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात, असा बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचा शनिवारी पणजीत शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची या उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव, नीरजा शेखर, इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांच्यासह भारत सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर आज जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाचा नाद, पुन्हा एकदा दुमदुमला.

भारतीय तसेच जागतिक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी गोव्याला यावे. इफ्फीमुळे जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना भारताच्या समुद्र किनार्‍यावरच्या या निसर्गसंपन्न राज्यातले सौदर्य अनुभवण्याची संधी मिळते.
– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Comment here